HW Marathi
मनोरंजन

एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी नसरुद्दीन शहांच्या नावाचा विचार ?

पुणे | काहीच दिवसांपूर्वी अभिनेता अनुपम खेर यांनी (फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) एफटीआयआयच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला त्यानंतर आता एफटीआयआयच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत मोठी चर्चा सुरु होती. आता या अध्यक्षपदासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून नसरूददीन शाह यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे म्हटले जात आहे. नसरुद्दीन शाह हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत.

नँशनल स्कूल आॅफ ड्रामानंतर नसरूददीन शाह यांनी एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला. ते संस्थेचे माजी विद्यार्थी असल्याने संस्थेच्या वातावरणाशी परिचित आहेत. त्यामुळे नसरूददीन शाह यांना एफटीआयआयच्या अध्यक्षपद देण्याचा विचार मंत्रालयाकडून केला जात आहे.

एका इंटरनॅशनल शोमुळे व्यस्त असल्याचे कारण अनुपम खेर यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड यांच्याकडेआपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अनुपम खेर यांनी पत्रात म्हटल्याप्रमाणे, एका इंटरनॅशनल टीव्ही शोसाठी त्यांना २०१८ ते २०१९ दरम्यान ९ महिने अमेरिकेत रहावे लागणार असल्याने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

Related posts

‘आम्ही बेफिकर’चे टीजर पोस्टर लाँच

News Desk

नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची संधी द्यावी | कंगना रणावत

सईच्या आयुष्यावरची थरारकथा ‘डेट विथ सई’  

News Desk