HW News Marathi
मनोरंजन

‘पद्मावत’ सिनेमाला देशभरातून विरोधात निदर्शने

नवी दिल्ली | ‘पद्मावत’ सिनेमाला संपूर्ण देशभरातून विरोध होत आहे. हा सिनेमा २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. त्यामुळे करणी सेना आणि राजपूत संघटनांनी ठिकठिकाणी या सिनेमा विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत.

  • अहमदाबादमधील मॉलमध्ये तोडफोड

करणी सेनाच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादमधील मॉलमध्ये तोडफोड आणि जाळपोळ केले असून येथे उभ्या असलेल्या ४० गाड्या तोडण्यात आल्या आहे. या प्रकरणात पोलिसांनी २०० लोकांना पकडण्यात आले आहे. तसेच गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही करावा लागला.

  • धुळ्यातील तापी नदीत २४ तासापासून आंदोलन

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथील राजपूत समाजाच्यावतीने ‘पद्मावत’ सिनेमावर बंदी घालण्यासाठी नदीत उतरुन आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात लहान मुले, मुली आणि महिला यांचा देखील समावेश आहे. तापी नदीत गेल्या २४ तासापासून हे जल आंदोलन सुरु आहे. दोंडाई पोलीस या आंदोलकांवर लक्ष ठेवून असून या सर्वांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.

  • गुडगावमध्ये कर्फ्यू लावला

पोलिसांनी गुडगावमध्ये रविवारपासून कर्फ्यू लावण्यात आला आहे. या करणी सेनाने गुडगावमधील ४० सिनेमागृह आणि मल्टीप्लेक्सला हा सिनेमा न प्रदर्शित करण्याची धमकी दिली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने येथे कर्फ्यू लावला आहे.

  • कानपूरमध्ये मल्टीप्लेक्समधील पोस्टर फाडले

काकादेवमधील सर्वोदय नगर येथील मल्टीप्लेक्समध्ये करणी सेनाने पद्मावत सिनेमाचे सर्व पोस्टर फाडले असून येथील काचा देखील फोडल्या आहेत. या सिनेमावर बंदी घालण्यासाठी विरोध प्रदर्शन करत आहे. तसेच कानपूर शहरात हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही.

  • मध्य प्रदेशमध्ये भन्साळी यांचा पुतळा जाळला

मध्य प्रदेशमध्ये राजपूत संघटनांनी कलेक्टरच्या कार्यालयासमोर पद्मावत सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा पुतळा जाळून सिनेमाला विरोध दर्शविला. इतर संघटना सुद्धा विरोध करत साहभागी झाल्या होत्या.

  • नाशिकमध्ये आंदोलन

नाशिकमधील गंगापूर धरण प्रवेशद्वारावर करणी सेना, महाराणा प्रताप सेनेने दिग्दर्शक आणि सिनेमा विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी ३० ते ३५ आंदोलकांना धरणाच्या बाहेरील प्रवेशद्वारावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्ही. शांताराम भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह

News Desk

जाणून घ्या… मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यामागचे वैज्ञानिक कारण

News Desk

आगमन बाप्पाचे | माटुंग्याच्या बाजारपेठेत तामिळनाडूचे बाप्पा

News Desk