मुंबई | ‘केदारनाथ’ या सिनेमात विरोधात धार्मिक भावना दुखावण्यात असल्याची जनहित याचिका दाखल केली होती. या सिनेमात अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. ही याचिकेवर आज (६ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला आहे.
PIL filed against the film #Kedarnath for allegedly hurting religious sentiments has been dismissed by Bombay High Court. pic.twitter.com/OM9ELOefH7
— ANI (@ANI) December 6, 2018
केदारनाथमधून सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. अभिषेक कपूरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सवर्ण समाजातील हिंदू मुलगी एका गरीब मुस्लिम टुरिस्ट गाईडच्या प्रेमात पडते, अशी या सिनेमाची कथानक आहे. ‘केदारनाथ’ चित्रपटाविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका राजकीय हेतूने प्रभावित असल्याचे सेन्सॉर बोर्डाने नमूद केले आहे.
तसेच ‘केदारनाथ’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी गढवाल येथील स्वामी दर्शन भारती यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या चित्रपटामध्ये २०१३ मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ भागात आलेल्या भीषण पुरातील पीडितांविरोधातील आणि हिंदूंच्या भावना दुखावणारे चित्रण असेल तर बंदी आणण्यात येईल, असे मुख्य न्या. रमेश रंगनाथन यांनी स्पष्ट होते. या चित्रपटात लव्ह-जिहादला प्रोत्साहन देण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.