HW Marathi
मनोरंजन

लवकरच रीगल सिनेमागृह बंद होणार

मुंबई | रीगल सिनेमागृह हे मुंबईतील सर्वात जुने सिंगल स्क्रिन आणि वातानुकूलित असे पहिलेच सिनेमागृह आता लवकरच बंद होणार आहे. गेली ८५ वर्षे जुने असलेले हे सिनेमागृह आर्थिक नुकसानीमुळे बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या एका वर्षांत या रीगल सिनेमागृहाला जवळपास एक कोटीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील कुलाबा कॉजवेजवळ असणारे रीगल सिनेमागृह लवकरच बंद होणार आहे.

या सिनेमागृहाची ११६० सीट्सची क्षमता असलेले सिनेमागृह असून व्यापार घसरून १५ ते २० टक्क्यांवर आला आहे. मुंबईतील  मल्टिप्लेक्सचाही या सिनेमागृहावर परिणाम झाला आहे. मल्टिप्लेक्स तिकिटांच्या पाचशे ते हजार रूपयांच्या तुलनेत रीगलचे दर दिडशे ते अडीचशे रूपये इतके आहे. हे सिनेमागृह ब्रिटीशकालीन असलेल्या या दोन मजली सिनेमागृहात आणखी दोन स्क्रिन आणि एक फूड कोर्टबाबत बोलणी सुरू आहेत. परंतु याबाबत कोणताही प्रतिसाद न आल्याचे कमल सिधवा तारापोरवाला यांनी दिली आहे.

Related posts

सनी लिओनीचा बायोपिक वादाच्या भौऱ्यात

News Desk

अभिनेता शहारूख खानची मुलगी रँम्पवर

News Desk

प्रदर्शनाच्या आधीच ‘2.0’ वादाच्या भोवऱ्यात

News Desk