HW Marathi
मनोरंजन

शाहरुखला भेटता आले नाही म्हणून फॅनने स्वतःवर केले ब्लेडने वार

मुंबई |  बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानच्या ‘मन्नत’ घरासमोर काल (३ नोव्हेंबर) रात्री एका फॅनने स्वतःवर ब्लेडने वार करून घेतल्याची घटना घडली आहे.  मोहम्मद सलीम असे या व्यक्तीचे नाव असून तो कोलकात्याच्या राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी रात्री शाहरुखच्या घरी प्री-दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

या पार्टीसाठी ‘मन्नत’वर सेलिब्रेटींची मांदियाळी होती. त्यावेळी  सलीमने स्वतःवर ब्लेडने वार करून घेतले. यात तो गंभीर जखमी झाला. यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलीमला उपचारानंतर सोडूनही देण्यात आले. शाहरूखचा ‘झिरो’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होताय. २ नोव्हेंबरला शाहरूखने या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला. या चित्रपटात शाहरुखशिवाय कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

शाहरुखने आपला वाढदिवस आणि प्री-दिवाळी पार्टीचे सोबतच साजर केले. या पार्टीसाठी आमिर खान, अर्जुन कपूर, इशान खट्टर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, कटरीना कैफ, संजय लीला भंसाली, काजोल, मान्यता दत्त, अर्पिता खान शर्मा, अलवीरा अग्निहोत्री, जया बच्चन, स्वेता बच्चन, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, मलाइका अरोरा, तापसी पन्नू, इम्तियाज अली, शायना एनसी आणि अनेक दिग्गज उपस्थित होते.

 

Related posts

कलावंत हीच माझी जात | नाना पाटेकर

News Desk

‘कलंक’च्या शूटिंगसाठी आलिया-वरुण होणार कारगीलला रवाना

Gauri Tilekar

सेक्सचे चार लक्षणे

News Desk