HW News Marathi
मनोरंजन

सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्व राज्यात ‘पद्मावत’ रिलीज

नवी दिल्ली – बहुचर्चिती ‘पद्मावत’ हा सिनेमा देशातील सर्व राज्यात रिलीज होणार आहे. या सिनेमावर राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि मध्यप्रदेश या चार राज्यात बंदी घातलण्यात आली होती. त्यानंतर निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

कोर्टाने गुरुवारी सकाळी यावर निर्णय देऊन सिनेमावरील बंदी उटवली आहे. या निर्णयामुळे निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असून हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या सुरुवातीपासून करणी सेने आणि राजपूत संघटना विरोध करत आहे. या सिनेमा रिलीज होण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. या सर्व विरोधानंतर सिनेमाचे नाव आणि रिलीज करण्याची तारीख देखली बदलण्यात आली.

सिनेमाला मंजुरी देण्यासाठी सेन्सॉर बॉर्डाने इतिहासकारांची विशेष समिती नेमण्यात आली होती. बॉर्डाने काही दृश्यांना कात्री लावल्यानंतर सिनेमाला परवागी देण्यात आली. सिनेमाला असलेला विरोध कमी होताना दिसत नाही. हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शन केले असून दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर यांची मुख्य भूमिका आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भूषण कुमार यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांबद्दल मी माफी मागते !

News Desk

नेहरु सेंटरमध्ये निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

News Desk

पहिल्यांदाच ‘आरॉन’मध्ये शशांक केतकर आणि नेहा जोशी एकत्र

News Desk