HW Marathi
मनोरंजन

उमेश आणि प्रियाची गुड न्यूज…!

मुंबई | काही दिवसांपूर्वी प्रिया बापट हिने सोशल मीडियावर एक गुड न्यूज आहे अशी पोस्ट शेअर केली होती. दादरच्या प्रभादेवी परिसरातही “दादा, मी प्रेग्नन्ट आहे.” असे होर्डिंगही लावण्यात आले होते. अनेकांनी या बाबत तर्कवितर्क काढले आणि अखेर हे गुपित उलगडले.
 नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन्स घेऊन येत आहे एक नवंकोरे नाटक “दादा,एक गुड न्यूज आहे.” नुकतेच या नाटकाचे  पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर रिलीज करण्यात आले. बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट आपल्याला ह्या नाटकाद्वारे पाहायला मिळेल. उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही भावा बहिणीची जोडी आपल्याला या नाटकात दिसणार आहे.
उमेश या नाटकामध्ये एक साधे नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत असून, ऋता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे.
ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित आणि  कल्याणी पाठारे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केली असून, नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली असून, आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे.

Related posts

पिया’च्या नटखट पहरेदारला रोखण्याची मागणी

News Desk

#HappyBirthdayLataDi | लतादीदी आयुष्यभर का राहिल्या अविवाहित ?

News Desk

लातुरची शिक्षिका कौन बनगो करोडपतीमध्ये..

News Desk