HW News Marathi
मनोरंजन

पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार विवेक ओबोरॉय

मुंबई | बॉलीवुडमध्ये सध्या बायोपिकचे वारे वाहू लागले आहेत. दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग राजकारणातील दिग्गज व्यक्तींच्या बायोपिकचा नुकताच ट्रेलर लॉन्च झाला आहे. आता अजून एका राजकीय नेत्याची बायोपिक येणार आहे. हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत.

मोदींच्या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबोरॉय हा मोदींच्या तरुणपणीच्या भूमिकेत दिसणार अशा चर्चा रंगल्या आहेत. अद्यापही या चर्चांना अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. परंतु सुत्रांच्या माहितीनुसार विवेकच्या नावावर जवळजवळ शिक्कामोहर्तब करण्यात आला आहे. अभिनेता परेश रावल हे मोदींच्या मुख्य भूमिकेत असणार आहेत.

‘मेरी कोम’ सिनेमाचा दिग्दर्शक उमंग कुमार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मोदी यांच्या जीवनावरील बायोपिक विषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोदी यांचा जीवन संघर्ष रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी रसिकांना सिनेमाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.

आधी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर लाॅन्च झाला. यानंतर माजी पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ बायोपिकचा ट्रेलर समोर आला. या दोन्ही सिनेमाच्या ट्रेलरवरून राजकीय वाद आणि चर्चा रंगू लागल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुपरस्टार राजेश खन्नांची १० सुपरहिट गाणी

News Desk

सवाई एकांकिका स्पर्धेत औरंगाबादची ‘मॅट्रिक’ ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

News Desk

आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली गणपती साजरा करण्यासाठी नाहर ग्रुप तर्फे दोनशे रहिवाशांना प्रोत्साहन

News Desk