HW News Marathi
राजकारण

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे चिन्हासाठी दिले ‘हे’ तीन नवे पर्याय

मुंबई | शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष चिन्हासाठी नवे तीन पर्याय दिले आहेत. निवडणूक आयोगाला (Election Commission) शिंदे गटाने (Shinde Group) तीन पर्याय पाठविले आहेत. शिंदे गटाकडून सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड निवडणूक आयोगाकडे ई-मेलद्वारे सादर करण्यात आलेल्याची माहिती एबीपी माझ्याने दिली आहे. उद्धव ठाकरे गटाने देखील ई-मेलद्वारे निवडणूक आयोगाला चिन्हांचे पर्याय पाठविले होते. त्याच प्रमाणे शिंदे गटाने देखील आज (11 ऑक्टोबर) ई-मेलद्वारे चिन्हांचे पर्याय पाठविले आहे.

नुकत्याच शिंदे गटाचा दसरा मेळवा पार पडला. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी 51 फुटी तलवार मेळाव्यात दिली होती. तेव्हा शिंदे गटा निवडणूक आयोगाकडे तलवारची मागणी करेल, अशा चर्चा रंगल्या होत्या. यानंतर शिंदे गटाने आज निवडणूक आयोगाकडे पाठविलेल्या चिन्हात तलवारचा पर्याय दिला आहे. त्यासोबत शिंदे गटाने सूर्य आणि पिवळाचे झाडाचे चिन्ह दिले आहे.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव दिले आहे. तसेच शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव निवडणूक आयोगाकडून समोवारी (10 ऑक्टोबर) मिळाले आहे. परंतु, निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अजून चिन्ह दिले नव्हते. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने  आज  दुपारपर्यंत चिन्ह सादर करण्याची मुदत दिली होती.. त्यापूर्वी शिंदे गटाने तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिल्यानंतर आगामी पालिका निवडणुकीसाठी सुद्धा हेच चिन्ह असणार आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग शिंदे गटाला कोणते चिन्ह देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया 

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नाव दिले. परंतु, शिंदे गटाला चिन्ह दिले नाही. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही अंधेरी पूर्व पोटनिवडणूक युतीने लढवणार आहोत. तर आम्ही निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण चिन्ह मागितले होते. परंतु, आम्हाला ते मिळाले नाही. ही आमच्यासाठी दु:खद घटना आहे. कारण, ज्याच्याकडे विधीमंडळात आणि संघटनात्मक बहुमत असते,त्यांनी निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. आमच्याकडे विधानसभा, लोकसभा, असे मिळून ७० टक्के बहुमत आहे.”

संबंधित बातम्या

“… आमच्यासाठी दु:खद घटना”, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव

Related posts

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान

News Desk

दुसरीकडे जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, थोरातांचा विखे-पाटील यांना टोमणा

News Desk

ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी छिंदमवर गुन्हा दाखल

News Desk