HW News Marathi
मनोरंजन

दिग्दर्शक राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप

मुंबई | प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. संजू सिनेमाच्या निर्मितीनंतर हा धक्कादायक प्रकार झाल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. राजकुमार यांनी ६ महिन्यात अनेक वेळा आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या महिलेने संजू सिनेमाच्या निर्मितीनंतर हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगितले.

या पीडित महिलेने तिच्यासोबत झालेल्या कृत्याची माहिती संजूचे सहनिर्माते विधू विनोद चोप्रा यांना मेलद्वारे दिली. याशिवाय विधू यांची पत्नी अनुपमा चोप्रा, कथा लेखक अभिजात जोशी, विधू यांची बहीण आणि संचालिका शेली चोप्रा यांनादेखील तिने मेल केला आहे. ‘राजकुमार हिरानीने कार्यालयात अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी आणि कार्यालयात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्याकडे गप्प राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता.

जेव्हापर्यंत मी शांत राहू शकत होते, तोपर्यंत गप्प बसले. कारण त्यावेळी मला नोकरी टिकवायची होती. मी त्यावेळी काही बोलले असते, तर माझे काम वाईट आहे, असे हिरानी यांनी सर्वांना सांगितले असते. त्यामुळे माझे भविष्य उद्ध्वस्त झाले असते,’ असे पीडितेने महिलेने मेलमधून तिच्यावर झालेल्याच्या अन्यांची व्यथा मांडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाची स्थगिती

News Desk

असा महात्मा होणे नाही…

swarit

मी काय बोलावे किंवा नाही, हा माझा मुद्दा आहे !

News Desk