HW News Marathi
मनोरंजन

Ganesh Chaturthi 2018 | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणराज विराजमान

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ येथे श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशभरात अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ढोल-ताशाच्या साथीने नाचत-गात, “गणपती बाप्पा मोरया” च्या गजरात अत्यंत प्रसन्न अशा मनाने आज घराघरांत बाप्पा विराजमान होणार आहेत. या विघ्नहर्त्याच्या आगमनाने वातावरणात वेगळाच उत्साह, अनुभवायला मिळत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचे सर्वसामान्य जनतेला ट्विटरद्वारे गुरुवारी दर्शन घेता आले.बळीराजा सुखी होऊ दे, राज्यवारील संकटांचे गणराया हरण करोत. अशी गणराया चरणी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र, देशवासीय तसेच विश्वातील गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सामाजिक संघटनासाठी सुरू केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुरू ठाकूरने ‘कृतांत’साठी गायले गाणे

News Desk

ऋषी कपूर यांच्या निधनाने निखळ आनंद देणारे हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वे हरपले !

News Desk

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड…

Manasi Devkar
राजकारण

Chhattisgarh Assembly Elections 2018 : मतदार यादीतून नावे गहाळ

News Desk

रायपूर | छत्तीसगढ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली आहे. मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. परंतु मतदान केंद्रत गेलेल्या बहुतांश लोकांचे नावे मतदार यादीतून गहाळ झाले. त्यामुळे लोकांनी मतदान केंद्र बाहेर येऊन गोंधळ घातला. गेल्या २५ वर्षापासून छत्तीसगढमध्ये राहत असलेल्या लोकांची नावे देखील मतदार यादी नसल्याने लोकांमध्ये नाराजी दिसून आली असून हा सर्व प्रकार जगदलपूरच्या गांधी नगरमधील अनेकांची नावे मतदारयादीतून गायब लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मतदानाला दुपारी पर्यंत २५.१५ टक्के इतके मतदान झाले आहे.

छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होत आहे. बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर राजनंदगाव येथील पाच मतदारसंघात आणि बस्तर येथील ३ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ ते ५ यावेळेत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे.

Related posts

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी डी. के. शिवकुमार यांनी ईडीकडून अटक

News Desk

यंदा बारामतीत भाजपचे कमळ फुलवू, मुख्यमंत्र्यांचा दावा

News Desk

राजीव गांधी यांच्या भारतरत्नवरुन आप’मध्ये वाद

News Desk