मुंबई | उत्तर प्रदेशातील अलाहाबाद म्हणजेच प्रयाग्रज येथे १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या प्रयाग्रज कुंभमेळा २०१९ साठी साधारण बारा कोटी भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मौनी आमावस्या दिवशी तीन कोटी भाविक येतील अशी अपेक्षा असून २० लाख भाविक येतील असा अंदाज आहे या दहा लाख परदेशी पर्यटकांचाही समावेश असणार आहे.
प्रयाग्रज कुंभ मेला २०१९ बाबत आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशचे शहर विकास मंत्री सुरेश कुमार खन्ना हे उपस्थित होते यावेळी ते म्हणाले हा कार्यक्रम देशात चार ठिकाणी आयोजित केला जातो प्रयागराज येथे होणारा हा कार्यक्रम हे आकर्षण स्थान असून देशातच नव्हे तर परदेशातही याबाबत उत्सुकता दिसून येत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे युनेस्कोतर्फे कुंभमेळ्याची गणना मानवी संस्कृती तील अद्वितीय सांस्कृतिक वारसा या यादीत केली गेली आहे. तसेच यावेळी कुंभमेळासाठी येणाऱ्या भाविकांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची माहिती त्यांनी दिली.
देशातल्या बंगळुरू, इंदौर, नागपूर, पटना आदी शहरांशी प्रयागराज हे शहर हवाई मार्गाने जोडण्यात आले आहे.येथे हेलिपोर्टही स्थापन करण्यात आले असून यामुळे पर्यटकांना हेलिकॉप्टर राईडचा आनंदही घेता येईल. उत्तर प्रदेश सरकारने कुंभमेळाच्या आयोजनासाठी २९ कोटी खर्च केले आहे. कुंभमेळासाठी येणाऱ्या भाविकांसाठी १ लाख २२ हजार शौचालय बांधण्यात आली आहे. तसेच कुंभातील पाणी स्वच्छ राखण्यासाठी विशेष सोय केली आहे, अशी माहिती सुरेश खन्ना यांनी दिली. गर्दीवर आवर घालण्यासाठी कमांड कंट्रोल सिस्टिम उभारण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी ५८ पोलिस चौकी, दोन लाख पोलिस कर्मचारी, ४०अग्निशमनदल कमांडोची व्यवस्था केली आहे तर ११ हजार स्वच्छता कर्मचारी नेमणूक केली आहे, असे लोकांच्या सुरक्षेव्यवस्थाबबात खन्ना यांनी सांगितले.
पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुंभमेळा भागामध्ये आलीशान टेण्ट सिटी स्थापन करण्यात आली आहे. देशातल्या प्रत्येक संस्कृतीचे प्रतिनिधित्व व्यवस्थित पार पहावे, यासाठी ३० थिमॅटिक गेट्स उभारण्यात आली असून या ठिकाणी २०० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.