जालना | ”भाजपकडे वॉशिंग मशीन आहे, पक्षामध्ये एखाद्याला घेण्यापूर्वी आम्ही त्यांना मशीनमध्ये धुतो. त्यासाठी आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे,” अशी टीका भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादींच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेशासाठी रांगच्या रांग लागल्या आहेत. दानवे यांनी जालनाच्या महाजनादेश यात्रेतील सभेत केले आहे.
Union Minister Raosaheb Danve Patil in Jalna, Maharashtra: BJP has a washing machine. Before taking anyone in the party, we wash them in the machine. We have the Nirma powder of Gujarat. (28.08.19) pic.twitter.com/WwGHvhEhbu
— ANI (@ANI) August 28, 2019
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “आम्ही कुठलीही वॉशिंग पावडर वापरत नाही, आमच्याकडे विकासाचे डॅशिंग रसायन आहे,” असा असा टोला सुप्रिया सुळेंना लगावला होता. त्यावर सुप्रिया सुळेंनी नाशिकमध्ये प्रत्युत्तर दिले म्हणाल्या की, “मी एक सायन्सची विद्यार्थी असल्याने सांगू शकते की, सगळीच रसायने चांगली नसतात. हा रसायनाचा विकास आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या रसायनापासून सावध रहा, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले होते.” सध्या महाराष्ट्राच्या राजकारणा राष्ट्रवादी विरोद्ध भाजप असा कलगीतुरा रंगला पाहयला मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.