HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते एका पाठोपाठ एक शिवसेना किंवा भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांमध्ये आता अजून एका नेत्यांचे नाव आले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विधानसभा निवडमुकीच्या पार्श्वभूमीवर अवधूत तटकरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अवधूत तटकरे आज (२९ ऑगस्ट) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे याआधीही अवधूत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध चांगले नसल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांचे भांडण सोडवण्यासाठी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण याला फार यश आले नाही. २०१६ ला अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमची युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही !

News Desk

सर्वात जाडी कातडी असलेला प्राणी म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस !

News Desk

जब तक खेल खतम नही होता आपुन इधरीच है !

News Desk