HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

पाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

कराड | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तान संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर टीका केली. “शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पाकिस्तानबाबत केलेले वक्तव्या करताना लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्या वक्तव्याचा फायदा देशाला होतो की, पाकिस्तानला होतो. मतांसाठी राजकारण करू नये,” अशी टीका मुख्यमंत्र्यांनी पवारांवर केली. मुख्यमंत्र्यांनी आज (१६ सप्टेंबर) साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

पवारांच्या या वक्तव्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना आज कराडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर ते म्हणाले की, “शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पाकिस्तानबाबत केलेले वक्तव्या करताना लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्या वक्तव्याचा फायदा देशाला होतो की, पाकिस्तानला होतो. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर केलेले वक्तव्याचा वापर संयुक्त राष्ट्रात केला. निवडणुकीत मतांसाठी असे वक्तव्य करणे योग्य नाही, पवारांना कदाचित माहिती नसेल की, भारतातील मुस्लमानांना देशातील जास्त अभिमान आहे. त्यांच्यासमोर पाकिस्तानची स्तुती केली ते मतं देतील, हा विचारच अन्यायकारक आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकता दिसून येते.”

पाकिस्तानसंदर्भात पवार नेमके या म्हणाले

सरकार भारत आणि पाकिस्तानमध्ये वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्यचाचे पवार म्हणाले. “पाकिस्तान म्हणजे मुस्लीम आणि मुस्लीम म्हणजे पाकिस्तान, असे वातावरण तयार केले जात आहे. पाकिस्तानमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही. काही लोक स्वतःचा फायद्यासाठी वाईट वातावरण निर्माण करत आहेत. देशात एक वेगळे वातावरण पसरवले जाते आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना मी पाकिस्तानमध्ये गेलो आहे. तेव्हा एक वेगळे वातावरण पाहिले. एक वेगळी स्थिती आज देशासमोर आली आहे.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचितमध्ये फूट, जलील यांच्या घोषणेवर औवेसींचा शिक्कामोर्तब

News Desk

 काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकणारी तरुणी ‘स्वाभिमानी’ची कार्यकर्ता

News Desk