HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

हर्षवर्धन पाटील आता अन्याय सहन करणार नाही

इंदापूर | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर करत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेशाच्या चर्चेत रंगल्या होता. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करत पुढची दिशा ठरविणार असल्याचे सांगितले होते. यानंतर पाटील यांनी आज (४ सप्टेंबर) कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात होते. त्यावेळी पाटील बोलताना म्हणाले की, आता अन्याय सहन करणार नाही, असे म्हणत भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहे.

दरम्यान हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, “लबाड, फसवणूक करणाऱ्या माणसांसाठी काम करायचं नाही. आघाडीची बैठक झाली जुन्नरची जागा सुटली तर इंदापुरची जागा का सुटली नाही? त्यामुळे आता निष्ठावान आणि प्रामाणिक माणसांसाठी काम करायचे आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून येत्या काही दिवसांत आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे, असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीवर केले आहे.

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापुरात शिवस्वराज्य यात्रा नियोजित नसताना अचानक यात्रा कशी आली? २३ एप्रिलला निवडणुकीचा निकाल लागला असताना आजची तारीख उजाडली तरी इंदापूरची जागा सोडण्याबाबत एकही वरिष्ठ नेता बोलत नाही. पुलाखालून बरचे पाणी वाहून गेले आहे. प्रामाणिकपणे काम करूनही राष्ट्रवादीकडून नेहमी अन्याय करण्यात आला. सभ्यपणाचा राष्ट्रवादीकडून गैरफायदा घेण्यात आला असा आरोप त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पंतप्रधान असते, तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता !

News Desk

पक्षामध्ये घेण्यापूर्वी आम्ही त्यांना गुजरातच्या निरमा पावडरने धुतो | दानवे

News Desk

सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार

News Desk