मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग मुंबई दौऱ्यावर आले आहे. मुख्य निवडणूक आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीत निवडणुकीच्या तारखांचा आढवा घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत आहेत. निवडणुक आयोगाची बैठक सह्याद्री अथितीगृहावर आज (१८ सप्टेंबर) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीची तारीख दिवाळीपूर्वी निश्चित करावी, अशी मागणी काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांनी मागणी केली आहे.
या बैठकीत राजकीय पक्षांच्या मागणीवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी. पण, निवडणूक आयोगाने ईव्हीएमनेच निवडणुका घेण्याचे निश्चित केल्याचे काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सांगितले. तसेच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट असल्याने निवडणुका सक्षम होईल असे, आश्वासन निवडणूक आयोगाने दिल्याचे शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी सांगितले. दरम्यान, निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादीने केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.