HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

जब तक खेल खतम नही होता आपुन इधरीच है !

उस्मानाबाद | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव आमदार राणा जगजीतसिंह पाटील आज (१ सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. या पिता-पुत्रांच्या प्रवेशानेत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार तर आहे. त्यांच्याबरोबर डॉ. पद्मसिंह पाटील आणि शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबातील अंतर्गत सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आले आहे. ओमर राजे यांनी आक्रमकपणे बॅनरबाजी करत पिता-पुत्रांवर टीका केली आहे.

ओमराजे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि पवनराजे निंबाळकर यांचे फोटो असलेले बॅन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या बॅनरमध्ये “जब तक खेल खतम नही होता आपुन इधरीच है, “वयक्ती नव्हे तर प्रवृत्ती सोबतचा संघर्ष चालूच राहील, काल आज आणि उद्यासुद्धा’, ‘वाघाचे कातडे पांघरुन गाढव कधी वाघ होत नसतात,” असे बॅनरमध्ये मचकूर लिहून पाटील पिता-पुत्रांवर निशाणा साधला.

डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी जनतेच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली होती. या मेळाव्यात आमदार राणा यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख करत या परिवाराने आपले राजकीय ध्येय स्पष्ट केले होते. त्यानंतर खासदार ओमराजे यांनी शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत डॉ पाटील परिवाराला विरोध करणार असून त्यांच्या प्रवृत्तीला मूठमाती देणार असल्याचे जाहीर केले होते.

पाटील पिता-पुत्र गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे आज प्रवेश करतील. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि पाटील कुटुंबात असणारा सत्तासंघर्ष जगजाहीर आहे. राणाजगजितसिंह यांनी दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भाजप प्रवेशाची घोषणा केली होती, तेव्हापासून ओमराजेंच्या समर्थक आक्रमक झाले आहेत.

पाटील पिता-पुत्रांना शिवसेनेचा विरोध

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डॉ. पाटील यांना पवनराजे हत्याकांडाप्रकरणी धारेवर धरले होते. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत त्यांच्यावर कडाडून टीकाही केली होती. उद्धव ठाकरे यांनी डॉ पाटील यांच्याविषयी मुसमुसलेला हत्ती आणि रेडा असे शब्द वापरत पवनराजे यांचे पुत्र ओमराजे यांना न्याय कधी मिळणार? असा प्रश्न विचारला होता. डॉ. पाटील सत्तेचा गैरवापर करत पुरावे नष्ट करतील आणि मोकाट सुटतील असा आरोपही उद्धव यांनी केला होता.

शिवसेनेचे मंत्री तानाजीराव सावंत यांनी भाषणादरम्यान पाटील यांच्या भाजप प्रवेशालाविरोध करत भाजप नेत्यांना सल्ला दिला की, ” माणसे घेऊन परिवर्तन होत नसते, जनतेची कामे करुन परिवर्तन होत असते. तुम्ही परिवर्तन करायला जात आहात, उलट अधोगतीच होईल.” सावंत पुढे असे देखील म्हटले की, “गाढव असताना वाघाचे गोंघडं पांघरुन वाघाच्या काळपात शिराल तर जनता जागा दाखवेल,”

 

Related posts

राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय, जम्मू-काश्मीमध्ये एमटीडीसी उभारणार दोन रिसॉर्ट

News Desk

राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे आज शिवसेनेत करणार प्रवेश

News Desk