HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, धनंजय मुंडेसह ५ जणांना मिळाली उमेदवारी

बीड | विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादीची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१८ सप्टेंबर) बीड जिल्ह्यातील पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. या मेळाव्यादरम्यान पवारांनी बीडमधील पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयसिंह पंडित, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावातून माजी मंत्री प्रकाश सोळंके व केजमधून नमिता मुंदडा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार आहेत.

विकासचे कारण सांगत निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्ष सोडून शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. परळीतून धनंजय मुंडे निवडणूक लढणार आहेत. हा पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असून या मतदारसंघात भावा-बहिणीमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्या कात्र मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली आहे

बीडमधील राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा

  • परळी मतदारसंघ – धनंजय मुंडे
  • बीड मतदारसंघ – संदीप क्षीरसागर
  • केज मतदारसंघ – नमिता मुंदडा
  • माजलगाव मतदारसंघ – प्रकाश सोळके
  • गेवराईतून मतदारसंघ – विजयसिंह पंडित

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते गणेश नाईक ११ सप्टेंबरला करणार भाजप

News Desk

BJP megabharti | भाजपची मेगाभरती ..

News Desk

छत्रपतींनी मागण्या करायच्या नाही, आदेश द्यायचा !

News Desk