HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

 काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई | काँग्रेसचे माजी आमदार आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते दिलीप माने यांनी आज (२८ ऑगस्ट) शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मानेंनी जाहीर प्रवेश करत शिवबंधन बांधून हातात भगवा झेंडा घेतला. यापूर्वी माने यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली होती. लोकांचे कामे सत्ताधारी पक्षात गेल्यानेच होत असतात, असे सागंत मानेंनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सोलापूरमधील दिलीप माने काँग्रेसचे नेते असून यापूर्वी करमाळ्यातील नेत्या रश्मी बागल-कोलते शिवसेनेत प्रवेश केला आहे. दिलीप माने हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात भाजपकडे आहे. या मतदारसंघातून सहकारमंत्री सुभाष देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणूक माने यांनी देशमुख यांच्याच विरोधात लढवली होती. त्यात कमी मताधिक्क्याने त्यांचा पराभव झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वाट गेल्या पाच वर्षापासून पाहत होतो!

News Desk

सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार

News Desk

अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश, सिल्लोडमधून मिळाली उमेदवारी

News Desk