HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीला धक्का, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश निश्‍चित

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार्‍या कार्यक्रमात महाडिक प्रवेश करणार आहेत. महाजानादेश यात्रेदरम्यान सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्य्या उपस्थिती व्हावा, यासाठी महाडिक यांचे प्रयत्न आहेत. महाडिक यांनी ३१ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहितू सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहकार्य न केल्यामुळे नाराज महाडिक भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, त्यांचे बंधू स्वरूप महाडिक यांची ताराराणी आघाडी तसेच जिल्ह्यातील गोकुळ अनेक सहकारी संस्थावर वर्चस्व असणारे माजी आमदार महादेवराव महाडिक हे धनंजय महाडिक यांचे सख्खे चुलत भाऊ सध्या भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादीचे खासदार म्हणून काम करत असताना धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी पेक्षा भाजपच्याजवळीक असल्याच्या आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा १२५-१२५चा फॉर्म्युला

News Desk

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये करणार प्रवेश

News Desk

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्तांचा संकल्प मेळावा, भाजप प्रवेशाची दिशा ठरविणार

News Desk