HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

उस्मानाबाद | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून दिग्गज नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहे. यात आता उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पद्मसिह पाटील यांचे सुपुत्र आणि कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पद्मसिह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रे पाठ फिरवल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. परंतु आज (२६ ऑगस्ट) होणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेत राणाजगजितसिंह दिसल्या नसल्याने पाटील भाजपत प्रवेश करणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राणाजगजितसिंह पाटील भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. एवढच नव्हे राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून ते भाजपत जाणार असल्याची चर्चा देखील समोर आली होती. राणाजगजितसिंह याच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार्‍या कार्यक्रमात महाडिक प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्य्या उपस्थिती व्हावा, यासाठी महाडिक यांचे प्रयत्न आहेत. महाडिक यांनी ३१ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहितू सूत्रांकडून मिळाली आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे भोसलेंना धक्का, सातारा लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर

News Desk

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एमआयएमची वाट बघणार !

News Desk

काँग्रेसची पहिली यादी आज होणार जाहीर, विद्यमान आमदारांना पुन्हा मिळणार संधी

News Desk