HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणुकीची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदेंकडे धुरा

मुंबई | महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेसने काल (२२ ऑगस्ट)ला निवडणुकीच्या छाननी समितीची प्रमुखपदी जबाबदारी मध्य प्रदेशचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा निर्माण करणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सहा जणांची एक समिती नेमली आहे. या समितीची प्रमुख पदाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सोपविली आहे. या समितीत हरिश चौधरी, मनिकम टागोर हे सदस्य तर अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रटरी मलिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, नेते के. सी. पडवी यांचा समावेश आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राधाकृष्ण विखेंनी आम्हाला वाट दाखवली | मधुकर पिचड

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकणारी तरुणी ‘स्वाभिमानी’ची कार्यकर्ता

News Desk

एमआयएम ७४ जागांवर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

News Desk