HW Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याला शिवसैनिकांचा विरोध

श्रीरामपूरम | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अहमदनगरमध्ये मोठा धक्का बसणार आहे. श्रीरामपूर येथील विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा शिवसेनेत प्रवेश केला आहे. कांबळेंच्या प्रवेशामुळे स्थानिक शिवसैनिकांनी नाराजीचा सूर आवळला आहे. कांबळे यांच्या विरोधात श्रीरामपुरात बॅनरबाजी करण्यात आले आहे. कांबळेंविरोधात केलेल्या बॅनरबाजीमध्ये म्हटले की, “‘सत्तेसाठी ससाणे साहेब, विखे साहेब, थोरात यांना फसवणाऱ्या गद्दार व बिनकामाच्या आमदाराला पाडायचे,” असा मजकूर बॅनरमध्ये लिहिला असून हे सर्व बॅनर शहरभर लावण्यात आले आहेत.

यापूर्वी ससाणे,विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून कांबळेंची ओळख होती. विखेंच्या भाजप प्रवेशानंतर कांबळेंनी बाळासाहेब थोरात यांचा हात धरला. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात काँग्रेसमधून शिर्डीतून लोकसभा निवडणूक  लढवली होती. परंतु निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या आधी कांबळे यांनी शिवसेने प्रवेश केला आहे.

 

Related posts

…तोपर्यंत शिवसेनेबरोबर युती करणार नाही !

News Desk

भीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत !

News Desk

एमआयएम ७४ जागांवर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

News Desk