HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राणाजगजितसिंह यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी कार्यकर्ते नाराज

उस्मानाबाद | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते पद्मसिह पाटील यांचे सुपुत्र आणि कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. या पिता-पुत्राच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आज दुपारी २ वाजता उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी पत्रकार परिषद घेणार आहे. परंतु या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राणा जगजितसिंह पाटील यांनी काल (३१ ऑगस्ट) दुपारी १ वाजता लेडीज क्लबच्या मैदानात त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विकासकांमे करण्यास आलेल्या अडचणी आल्या यांची चर्चा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी करत भाजप प्रवेश केल्याचे सांगितले. सोलापूरमध्ये आज महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ३ नेत्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

सुभाष देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे खासदार धनंजय माहडिक आणि जयकुमार गोरे यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थिती आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हर्षवर्धन पाटील आता अन्याय सहन करणार नाही

News Desk

आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून आम्ही युतीच्या भानगडीत पडणार नाही !

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक, युतीच्या जागा वाटपावर चर्चा

News Desk