HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे आज शिवसेनेत करणार प्रवेश

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस गळती सुरूच आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचा पुतण्या आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आज (९ सप्टेंबर) शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अवधूत तटकरे शिवबंधन बंधनात अडकणार आहेत.

अवधूत तटकरे यांच्यासोबत श्रीवर्धनमधील त्यांचे काही कट्टर कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत. तसेच माजी उपजिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बाळशेठ (भाऊ ) करडे यांचाही आज शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. यापूर्वी अवधूत यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.

अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध चांगले नसल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांचे भांडण सोडवण्यासाठी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण याला फार यश आले नाही. २०१६ ला अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर काँग्रेसला मोठा झटका, जिल्हाध्यक्ष देणार राजीनामा ?

News Desk

राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर

News Desk

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये करणार प्रवेश

News Desk