HW Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

मावळणाऱ्यांची चिंता करू नका, उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याकडे लक्ष द्या !

सोलापूर | ‘पक्षाला सोडून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. मावळणाऱ्यांची चिंता करू नका. उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याकडे लक्ष द्या, गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्यातील नेत्यानी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर पवारांनी सोलापूर दौऱ्याचे आयोजन केले आहे.

यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘सोलापूर या स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्यांना लोक जागा दाखवतात,’ पवार पुढे म्हटले की, “पक्षाला सोडून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. मावळणाऱ्यांची चिंता करू नका. उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याकडे लक्ष द्या, गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा.” लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्यांना आता लोकच जागा दाखवणार असून मी काय म्हातारा झालोय का ? अजून तरुणाईच्या जोरावर अनेकांना घरी पाठवायचे” असा जोरदार टीका पवारांनी विरोधकांवर केली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १९५७ साली काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला विजय मिळाला होता, असा हा जिल्हा आहे. अशीही आठवण पवारांनी यावेळी सांगितली. तसेच इतर ठिकाणी काय झाले याची काळजी न करता, इथे सोलापूरमध्येच इतिहास घडवू. सत्ता येते जाते, त्याची काळजी नाही. मी ५२ वर्षांपासून निवडून येतो. निवडून येण्याचा विक्रम आहे. जनतेमुळे इतके यश प्राप्त झाले. त्यामुळे यश मिळणारच आणि इतिहास घडवणारच, असाही विश्वास पवारांनी यावेळी व्यक्त केला.

Related posts

Ayodhya Case : आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता

News Desk

तुमचा राग तुमची मने जिवंत ठेवा !

News Desk

कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, नवनिर्वाचित आमदारांना देणार शपथ

News Desk