HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

भाजपच्या सर्व्हेमध्ये विधानसभा निवडणुकीत युतीला मिळणार २२९ जागा

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एक सर्व्हे (सर्वेक्षण) करण्यात आले आहे. या आधारे राज्यात भाजपला निवडणुकीत महायुतीला २२९ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्या आहेत. यामुळे युतीच्या जगावाटपावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (३ सप्टेंबर) रात्री १० वाजता कोअर मिटीची बैठक वर्षा बंगल्यावर बोलविण्यात आली आहे.

शिवसेना-भाजपने २०१४ची निवडणुकीच्या स्वतंत्र लढविली होती. यंदाचीही विधानभा निवडणूक युतीत लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार विधानसभेत युतीला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात युतीत आणि अपक्ष असे मिळून १८३ जागांचे बहुमत असणार आहे. या सर्व्हेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला निवडणुकीत ५० ते ६० जागांमध्ये समाधान मानावे लागणार आहे.

भाजपने महायुती होणार असल्याचे लक्ष्यात घेत हा सर्व्हे केला आहे. याचाच अर्थ युतीत निवडणूक लढवण्याची भाजपची भूमिका स्पष्ट होत आहे. दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी जालना एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमध्ये सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती

News Desk

Rupali Chakankar NCP | असंही ‘त्यांचा’ कार्यकाळ संपणारच होता !

swarit

 स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पंतप्रधान असते, तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता !

News Desk