HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रवादीचे दिलीप सोपल २८ ऑगस्टला शिवसेनेत करणार प्रवेश

सोलापूर | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. सोपल यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली आहे. यात सोपल यांनी येत्या २८ ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

सोपल हे उद्या (२७ ऑगस्ट) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहे. तर बुधवारी (२८ ऑगस्ट) दुपारी १ वाजता मातोश्री येथे निवडक कार्यकर्त्यांच्या समवेत सोपल हातावर शिवबंधन बांधणार आहेत. राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीला आमदार दिलीप सोपल यांनी दांडी मारली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरु झाली होती. आज त्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे.

भाजपा-शिवसेना युतीच्या जागावाटपनुसार बार्शी विधानसभेची जागा शिवसेनेकडे येते. त्यामुळे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बोलले जाते. सोपल यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेल्याने दिलीप सोपल यांचा मार्ग मोकळा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rupali Chakankar NCP | असंही ‘त्यांचा’ कार्यकाळ संपणारच होता !

swarit

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्तांचा संकल्प मेळावा, भाजप प्रवेशाची दिशा ठरविणार

News Desk

शरद पवारांनी जो सन्मान दिला तितका भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही !

News Desk