HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

अखेर उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

सातारा । गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, त्यांचा भाजप प्रवेश पुढे ढकलला जात होता. अखेर येत्या १४ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. नवी दिल्लीमध्ये उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा पार पडला आहे. तसेच यानंतर उदयनराजे १५ सप्टेंबर साताऱ्यात येणाऱ्या भाजपच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आशिर्वाद घेऊनच उदयनराजेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उदयनराजेंनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण भाजपमध्ये येत नसल्याचे स्पष्ट केले होते, त्यानंतर आता त्यांनी काल (१२ सप्टेंबर) पवारांची भेट घेतली.

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे बैठकीत उपस्थित होते. उदयनराजेंनी राष्ट्रवादी पक्ष सोडू नये म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भेट घेत त्यांना पक्षांतर न करण्याची विनंती केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप-शिवसेनेमध्ये निवडणुकीसाठी जागांची होणार अदलाबदली | सूत्र

News Desk

Narendra Patil Vs NCP | ‘मिसळीचा ठसका’ राष्ट्रवादीला लागला ..

News Desk

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

News Desk