HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

‘मी पस्तावतोय’ मुख्यमंत्र्यांविरोधात कोल्हापुरात पोस्टरबाजी

कोल्हापूर | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेला आज (१७ सप्टेंबर) कोल्हापूरात सुरुवात झाली आहे. महाजनादेश यात्रेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांविरोधात ‘मी पस्तावतोय’ म्हणत वेगवेगळ्या मुद्यांना अनुसरुन मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला विरोध दर्शविला आहे.

कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर, कावळा नाका, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, उमा टॉकीज, हॉकी स्टेडिअम, गोखले कॉलेज, सर्किट हाऊस येथे हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये ‘पाकिस्तानी कांदा आयात करून’, ‘राज्यातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर’, ‘मी पस्तावतोय फसवी कर्जमाफी द्यायला,’ ‘मी पुन्हा येणार तुमच्या कोंबड्या चोरताना पाहायला,’ आणि ‘पक्षात येता की ईडी पाठवू’, असा मचकूर असलेले कोल्हापुरात लावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे आज शिवसेनेत करणार प्रवेश

News Desk

हर्षवर्धन पाटील आता अन्याय सहन करणार नाही

News Desk

सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार

News Desk