HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

कोल्हापूर काँग्रेसला मोठा झटका, जिल्हाध्यक्ष देणार राजीनामा ?

कोल्हापूर | काँग्रेस-राष्ट्रवादीमधील पक्षांतर दिवसेंदिवस वाढच जाताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपता गेले. आता यापाठोपाट प्रकाश आवाडे यांच्या काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने गळालेल्या काँग्रेसचा निवडणुकी आदीच आणखी खराब हालत झाली असून विधानसभा निवडणूक इचलकरंजीतून अपक्ष लढविणार असल्याची माहिती मिळाली आहे. आवाडे यासंदर्भात आज (४ सप्टेंबर) संध्याकाळी पत्रकार परिषद घेवून घोषणा करणार आहेत.

प्रकाश आवाडे यांना सात महिन्यापूर्वी कोल्हापूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. जिल्हा परिषदेत आवाडे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडी भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. प्रकाश आवाडे हे इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून मागच्या दोन्ही विधानसभा निवडणूकीमध्ये हात या चिन्हांवर पराभूत झाले.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणूकीत कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा दारुण पराभव झाला. प्रकाश आवाडे हे तीन वेळा खासदार होते. सहकार क्षेत्रात मोठा दबदबा आहे. साखर कारखाना, बँक, सुतगिरण, आदी सहकाराचे मोठे जाळे त्यांनी विणले आहे. प्रकाश आवाडे १९८८ ते १९९० मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री होते. सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री आणि नंतरच्या काळात कॅबिनेट वस्त्रोद्योग होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एमआयएम ७४ जागांवर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

News Desk

बुरे काम का बुरा नतीजा क्यों भाई चाचा हाँ भतीजे !

swarit

Chitra Wagh| पळणारी आणि घाबरणारी मी नाही ..

News Desk