HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

पंतप्रधान ‘हाऊडी मोदी’मध्ये भारतीय समुदायाला संबोधित करणार

वॉश्गिंटन | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२२ सप्टेंबर) सात दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. ‘हाऊडी मोदी, हा कार्यक्रम टेक्सासमधल्या ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडिअममध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या ‘टेक्सास इंडिया फोरम’नुसार, ५० हजारांहून अधिक लोकांनी या सोहळ्याला येण्यासाठी नावनोंदणी केली आहे. कार्यक्रमाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही उपस्थित राहणार असल्याचे ‘व्हाईट हाऊस’ने कळवले आहे. अमेरिकेत इतक्या मोठ्या प्रमाणावर मोदींचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या कार्यक्रमाला खास उपस्थित राहण्यामागे त्यांचा कारण म्हणजे पुढील वर्षी म्हणजे २०२०मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहे. पार्श्वभूमीवर भारतीय अमेरिकींची मते निवडणुकीत मिळविण्यासाठी ट्रम्प कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचे चर्चा रंगल्या आहेत. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे उमेदवार म्हणून आधीच जाहीर झाले आहेत.

मोदींची संयुक्त राष्ट्र सभेत हजेरी

या दौऱ्यादरम्यान मोदी संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार आहेत. यासभेत मोदी गरिबी निर्मुलनासाठी प्रयत्नांत वाढ करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे, हवामान बदल रोखण्यासाठी प्रयत्न यासांरख्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्राने येत्या मंगळवारी (२४ सप्टेंबर) आयोजित केलेल्या सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. ५० किलोवॅट क्षमतेच्या गांधी सौर प्रकल्पाचं आणि गांधी शांती उद्यानाचे उद्घाटन यावेळी त्यांच्या हस्ते होणार आहे. देशात स्वच्छ भारत अभियान सुरु करून स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण केल्याबद्दल मोदी यांना ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी भिडेंनी घेतली उदयनराजेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk

काॅलर उडवणे भाजपच्या शिस्तीत बसत नाही !

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक, युतीच्या जागा वाटपावर चर्चा

News Desk