HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

अखेर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक ९ सप्टेंबरला करणार भाजप प्रवेश

नवी मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. गणेश नाईक येत्या ९ सप्टेंबरला नवी मुंबईत भाजपच्या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नितीन गडकरी यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नाईक यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि माजी खासदार संजीव नाईक हेदेखील भाजपमध्ये जाणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच त्यांचे पूत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता जिल्ह्यातील नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह गणेश नाईक लवकरच प्रवेश करतील, अशी चर्चा रंगल्या होत्या. गणेश नाईक यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे ५५ नगरसेवक आणि अपक्ष २ नगरसेवक असा एक वेगळा गट आज (६ सप्टेंबर) कोकण भवन कार्यालयात जाऊन नोंदणी करणार आहे. नवी मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी ५६ नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे नाईक समर्थक नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात येईल आणि नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Patil Vs NCP | ‘मिसळीचा ठसका’ राष्ट्रवादीला लागला ..

News Desk

शरद पवार यांच्या भेटीनंतर उदयनराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये राहणार ?

News Desk

भाजप प्रवेशासंदर्भात उदयनराजे भोसले यांची संभ्रमावस्था

News Desk