HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

काँग्रेसची पहिली यादी आज होणार जाहीर, विद्यमान आमदारांना पुन्हा मिळणार संधी

मुंबई। विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. मात्र, काँग्रेस आज (१० सप्टेंबर) त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेसच्या या यादीत एकूण ६० उमेदवारांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जाते.

काँग्रेसकडून ३० विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तर मागील निवडणुकीत पराभव झालेल्या दिग्गजांनाही संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपले ७० उमेदवार निश्चित केल्याची माहितीसमोर आली आहे. काँग्रेसची शनिवारी (७ सप्टेंबर) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित झाल्याचे समजते.

शिवसेना-भाजप येत्या दोन दिवसांत युतीचीही घोषणा होईल, असे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. युतीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा पार पडली असून या आठवड्यात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात युतीच्या फॉर्म्युल्याबाबत बैठक पार पडणार आहे. मात्र युतीच्या फॉर्म्युल्याचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढच्या वर्षीही ‘वर्षा’ निवासस्थानी करणार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। मुख्यमंत्री

News Desk

Narendra Patil Vs NCP | ‘मिसळीचा ठसका’ राष्ट्रवादीला लागला ..

News Desk

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी पंतप्रधान मोदी ‘या’ कारणामुळे अनुपस्थित

News Desk