पुणे। साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय तुर्तास लांबीला आहे. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. भाजपमध्ये जाण्याच्या उदयनराजेंच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध केला असून यानंतर उदयनराजे सध्या भाजप प्रवेशासंदर्भात संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र दिसून आले आहे. मात्र, उदयनराजे राष्ट्रवादीच थांबण्याचा निर्णय घेत्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यात भाजप प्रवेशासाठी घेतलेली बैठक स्थगित करण्यात आली असून उदयनराजेंच्या प्रवेशासंदर्भात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीम्हटले की, ‘उदयनराजेंचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे. उदयनराजेंनी भाजपत जाऊ नये. यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याचे समजते आहे.’
उदयनराजेंनी पक्ष सोडू नये म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भेट घेत त्यांना राष्ट्रवादी सोडू नका अशी विनंती केली होती. उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यावरून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी कल ( ९ सप्टेंबर) पुण्यात काही कार्यकर्त्यांची भाजपमध्ये जायचे की राष्ट्रवादीतच राहायचे यासाठी एका हॉटेलमध्ये बैठक बोलावली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पुण्यात हजर झाले होते.अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. यामुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने नवे वळण घेतले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.