HW News Marathi
महाराष्ट्र

अक्कलकोटमध्ये हनुमानाची ध्यानधारणा

सोलापूरः स्वामी समर्थांमुळे अक्कलकोटला सर्वत्र वेगळी ओळख मिळाली आहे. शकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांच्या मंदिरात दररोज हजारो भाविक येऊन दर्शन घेतात. कुठल्याही दिवशी या मंदिरात भाविकांची तितकीच वर्दळ पाहायला मिळते. विशेषकरून गुरूवारी तेथे नित्यनियमाने भाविक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असतात. परंतु हा गुरूवारी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांसाठी खास ठरला. कारण या गुरूवारी भाविकांना स्वामींच्या मंदिरात चक्क माकडाचे ध्यान पहायला मिळाले. गुरूवारी सकाळी गर्दीच्या वेळी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला लोकांना माकडाचे दर्शन झाले. मंदिरात हे माकड आले कसे असा प्रश्नही अनेकांना पडला. मंदिराच्या दाराजवळ हे माकड तब्बल 10 मिनिटे बसून ध्यान करत होते. दोन्ही हात मंदिराच्या प्रवेश दाराच्या उंबरठ्यावर ठेवून डोळे बंद करून ते बसले होते. मंदिरात अचानक आलेल्या माकडाला पाहून तेथिल काही भाविकांनी त्याच्या बाजूला खाण्यासाठी दाणे ठेवले पण माकड चिंतनात इतके व्यस्त होते की त्याने आजूबाजूला पाहिलंही नाही. स्वामींच्या गाभाऱ्यात सुरू असलेली पूजा त्या माकडाने दरवाजात बसून पाहिली. या सगळ्या घटनेचं मोबाइलमध्ये चित्रिकरण झालं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेंड्याच्या कातडीचं हे सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, मात्र…! । चंद्रकांत पाटील

News Desk

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?

News Desk

एकनाथ शिंदे यांचा फोटो समोर ठेवत अघोरी जादू टोण्याचा प्रकार, दोन जण अटकेत

News Desk