HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांचा फोटो समोर ठेवत अघोरी जादू टोण्याचा प्रकार, दोन जण अटकेत

ठाणे | ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जादुटोणा करणाऱ्या दोघांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांचा जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर केला जात होता.

अघोरी पूजा करणाऱ्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करुन अघोरी जादूटोणा करण्यात येत होता. याप्रकरणी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड विक्रमगड तालुक्यातील आणि जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून दोघांना रंगेहाथ अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवैध धंदे बोकाळल्याने महिला संतप्त

News Desk

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका! – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Aprna

सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा! – जयंत पाटील

Aprna