HW News Marathi
महाराष्ट्र

आता पोलीस आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मुंबईत हक्काचे घर

मुंबई : मुंबईत स्वत:चे घर असावे ही प्रत्येकाचीच ईच्छा असते. पण आपल्या तुटपुंज्या पगारात ती पूर्ण करणे नोकरदारांसाठी महत्कठीण असते.मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी २४ तास ऑनड्युटी असणारे पोलीस किंवा अन्य सरकारी कर्मचारीही त्याला अपवाद नाहीत. त्यांच्या मदतीला आता मायबाप शासन धावून आले आहे. लवकरच मुंबईत त्यांना हक्काची घरे मिळणार असल्याची खूशखबर आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या वतीने भाडेतत्त्वावरील घरे योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या महानगर क्षेत्रातील सदनिकांमधील पाच टक्के सदनिका पोलिसांसाठी तसेच पाच टक्के सदनिका वर्ग तीन व वर्ग चारच्या प्राधिकरण व सरकारी कर्मचारी यांच्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे ही घरे भाडेतत्त्वावर नव्हेत, तर मालकी देण्याचा हा निर्णय आहे.

प्राधिकरणाच्या वतीने भाडेतत्त्वावरील घरे योजनेअंतर्गत सदनिका बांधून वाटप करण्यात येतात. या योजनेअंतर्गत पालिका तसेच नागरी क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या व त्या सदनिकांच्या वाटपाचे धोरण न ठरलेल्या ३०० चौरस फुटांच्या २१ हजार ६७२ सदनिकांच्या वाटपाचे धोरण या वेळी ठरविण्यात आले. या सदनिकांपैकी पाच टक्के म्हणजे एक हजार ८४ घरे पोलिसांना मालकी तत्त्वावर देण्यात येणार आहेत, तर एक हजार ८४ घरे प्राधिकरण व सरकारी सेवेतील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. त्यातील २१७ घरे प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. ही घरे ठाण्यात पाचपाखाडी व नौपाडा येथे, तर मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात महाजन वाडी मीरा व्हिलेज या परिसरात आहेत.

घराची किंमत सहा लाख रुपये

या घरांची किंमत ही सहा लाख रुपये इतकी किंवा या सदनिका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत आहेत तेथील सदनिकेसाठीच्या रेडि रेकनर किमतीच्या २५ टक्के किंमत यापैकी जास्तीत जास्त किंमत प्रस्तावित करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमधून एक्झीट घेत आणखी एक नेता राष्ट्रवादीची वाट धरणार?

News Desk

प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा! – ॲड.यशाेमती ठाकूर

Aprna

पंतप्रधान उद्या पुण्याला भेट देणार; पुणे मेट्रो प्रकल्पाचे करणार उद्घाटन

News Desk