HW News Marathi
महाराष्ट्र

एकाचा मुदडा पाडून लुटला पेट्रोलपंप

मध्यरात्री सामसाम झाल्यानंतर डाव साधत दरोडेखोरांनी धुळ्यातील पेट्रोल पंपावर दरोडा घातला. या वेळी तेथे कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला चढवित, त्यांनी एकाचा मुदडा पाडला, तर दोघांना गंभीर जखमी केले. धुळे – जळगाव रस्त्यावर फागणे गाववजवळील कोयल फिलिंग स्टेशन पेट्रोल पंपावर शनिवारी मध्यरात्रीनंतर सुमारे पावणेतीन वाजताच्या सुमारास हादरोडा पडला.

तीन दरोडेखोर सुरत, नागपूर महामार्गावर पायी चालत आले. त्यांनी पेट्रोल पंपासमोरील ध्वज फाडून तोंडाला बांधून पंपाच्या केबिन शिरकाव केला. काठी आणि धारदार शस्त्राने पंपावरील एका कर्मचा-यावर त्यांनी वार केला आणि त्याला जखमी केले. गल्ल्यातील रोख 15हजार लुटून सीसीटीव्ही कॅमेरे तोडून अन्य दोन कर्मचा-यांना मारहाण करून तेथून पळ काढला.. या हल्ल्यात केबिनमधील एका कर्मचा-याचा मृत्यू झाला असून तोनिफाड येथील रहिवासी होता..

तसेच पंपावरील अन्य दोन कर्मचारी जखमी असूनत्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १८४ कोटी रुपयांची तरतूद! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

राज्यातील मंदिरे खुली; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी घेतले परळीत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

News Desk

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी तातडीची मदत जाहीर!

News Desk