HW News Marathi
महाराष्ट्र

चोरीच्या गाड्या अॉनलाईन विकणा-या विद्यार्थ्याला अटक

मुंबई बारावी सायन्सचा विद्यार्थी जयकिशन सिंगला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी वाहनचोरी प्रकरणी अटक केली आहे. ड्रग्सच्या वेसनामुळे जयकिशनचा आयुष्य उध्दवस्त झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयकिशन हा दुचाकींची चोरी करायचा आणि त्यांची ओएलएक्सवर विक्री करायचा. जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावीच्या सायन्स टॉपरपैकी एक असून त्याला 2015-16 मध्ये बोर्डाच्या परीक्षेत 98.50% गुण मिळाल्याचा दावा, त्याच्या पालकानी केला आहे.. मात्र पोलिसांनी याला नकार देत त्याला 44 टक्के असल्याचे सांगितले. जयकिशन ओमप्रकाश सिंग अंधेरी पूर्वच्या मालपाडोंगरी परिसरात कुटुंबासोबत राहतो. गाडी चोरुन ती निर्जनस्थळी ठेवायची. त्यानंतर त्याचा फोटो काढून ओएलएक्स’वर शेअर करायचा आणि ती विकत होता. अशी माहिती डीसीपी एन.डी. रेड्डी यांनी दिली.

सहा महिन्यांपूर्वीही जयकिशनला वाहनचोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याने एमआयडीसी परिसरातून एक मोटरसायकल चोरुन तिची जाहिरात ‘ओएलएक्स’ वर टाकली. ती मोटारसायकलच्या मालकाने पाहून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतरही बटन नावाच्या ड्रग्जचं व्यसन जडल्यामुळे त्यानं वाहनचोरीचा सपाटा सुरुच ठेवला आणि तो पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर प्रीतम मुंडे नाराज समर्थकांच्या भेटीला

News Desk

शरद पवारांनंतर तुमचं काय स्थान राहील ते विचारावं, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना सवाल

News Desk

एल्गार परिषदेसंदर्भात पुणे पोलिसांना ६ फेब्रुवारीपर्यंत बाजू मांडण्याची मुदत

swarit