HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर यांचं निधन

मुंबई ज्येष्ठ पत्रकार, लेखक, महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवळकर यांचं ह्यूस्टन येथे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी लोकसत्ता वृत्तपत्रातही सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिले. त्यांची एकूण २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी केलेले सडेतोड लिखाण आजही वाचकांच्या स्मरणात आहे. तळवळकर यांना पत्रकारिकेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी.डी.गोयंका, दुर्गारतन अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली 

News Desk

तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या बालकांची सुटका

Manasi Devkar

HW Exclusive: मी राजकीय षडयंत्राचा बळी | एकनाथ खडसे

News Desk