HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा शिवसेनेला रामराम!

नागपूर। शिवसेनेला आता मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे मोठे नेते आणि विदर्भाचे सहसंपर्कप्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जातीय पण जुन्या शिवसैनिकांना डावललं जातंय, असा आरोप करत त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतलाय. नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार

दोन महिन्यात शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. गेल्या महिन्यात अशोक शिंदे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आता शेखर सावरबांधे यांनी सेना सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार पडलं आहे.शिवसेनेत बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जातीय, पण जुन्या शिवसैनिकांना डावललं जातंय. मी जवळपास 20 वर्षे शिवसेनेत राहिलो. पण आता पक्षाचं चित्र पाहता सेनेत राहणं शक्य नाही, असे आरोप करत त्यांनी सेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत.

विदर्भात शिवसेनेची ताकद कमी आहे. शिवसेना पक्षनेतृत्व विदर्भात जास्त लक्ष देत नाही, असा स्थानिक शिवसैनिकांचा सातत्याने आरोप असतो. आता नागपूर महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशातच सावरबांधे यांच्या धक्कातंत्राने शिवसेना बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती.

कोण आहेत शेखर सावरबांधे?

शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती. विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती. परंतु “आपले नेते खा. गजानन किर्तीकर यांच्या शब्दाला निर्णय प्रक्रियेत स्थान नाही, मग आपण सेनेत राहून काय करायचं?”, असा सवाल उपस्थित करुन त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या निर्णयाने सेनेला मोठा धक्का बसलेला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरु व्हावी असे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar

आपल्याला शिवसेना प्रमुखांना १०० आमदारांची तोफरुपी सलामी द्यायची आहे !

News Desk

वर्षा राऊत आज ई़डी कार्यालयात चौकशीला जाणार नाही, तर ईडीकडे काही दिवसांचा मागितला वेळ – संजय राऊत

News Desk