HW News Marathi
महाराष्ट्र

देशाचे चौदावे राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान सुरू छगन भुजबळ जेलबाहेर

मुंबईः देशाचे 14 वे नवे राष्ट्रपती ठरवण्यासाठी सोमवारी सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबई विधान भवनमध्ये मतदानाची सोय करण्यात आली असून अनेक लोकप्रतिनिधींनी सकाळी दहा वाजल्यापासून मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली. दरम्यान, एनडीएचे उमेवार रामनाथ कोविंद यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्याविरोधात मीरा कुमार उभ्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सकाळीच नवी दिल्ली येथे मतदानाचा हक्क बजावला.

भाजप, भाजपचे मित्रपक्ष यांच्यासह केंद्र सरकारमध्ये सहभागी नसलेले अनेक पक्ष यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्या पारड्यात सध्याच्या घडीला जवळपास दोन तृतीयांश मते आहेत. त्यामुळे रामनाथ कोविंद देशाचे चौदावे राष्ट्रपती होतील,याबद्दल भाजपला विश्वास आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती नेमकी भाजपच्या उलट पाहायला मिळते आहे. उमेदवार निवडीपासूनच काँग्रेस पक्ष गोंधळलेला पाहायला मिळाला. भाजपने दलित कार्ड खेळल्यावर काँग्रेसची फरफट झाली. भाजपमुळेच काँग्रेसलादेखील मीरा कुमार यांच्या रुपात दलित उमेदवार द्यावा लागला. मात्र उमेदवार निवडीला उशीर झाल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. तरीही 18 विरोधक मीरा कुमार यांच्या बाजूने मतदान करण्याचा अंदाज आहे. दरम्यान, सध्या जेलची हवा खात असलेले छगन भुजबऴ व रमेश कदम यांनाही मतदानासाठी परवानगी मिळाली असून ते तासभरासाठी जेलमधून बाहेर येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिकची मदत मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार- पालकमंत्री छगन भुजबळ

News Desk

पांडुरंग फुंडकर दांडी मारण्यात अव्वल

News Desk

स्वत: समृद्ध होण्यासाठी पांडुरंग बरोरा शिवसेनेत गेले का ?

News Desk