HW News Marathi
महाराष्ट्र

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 25 ग्रेस मार्क

उत्तम बाबळे

नांदेड :- शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोक कला प्रकारात सहभागी होणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे २५ वाढीव गुण देण्याचा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार मार्च २०१७ पासून दहावीच्या परीक्षेमध्ये कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या‍ विद्यार्थ्यांना वाढीव गुणाची सवलत देण्यासाठी शास्त्रीय संगीत, नृत्य व वादन तसेच लोककला क्षेत्रातील संस्थांचे प्रमाणपत्र देण्यासाठी आता ५ संस्थाना मान्यता देण्यात आली असल्याची माहिती लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिवांनी दिली आहे. इयत्ता ११ वीच्या प्रवेशपत्रासाठी या शासनमान्य असणाऱ्या पाच संस्थांमधील विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील राखीव जागांवर सन २०१६ – १७ या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येत होता. या पाच संस्थांचा आता विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुण देण्याकरीता निवड करण्यात आलेल्या संस्थांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येत आहे. या संस्था पुढीलप्रमाणे अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, सरफोजी राजे भोसले डान्स रिसर्च इन्स्टिटयूट, नालंदा नृत्त्य कला महाविद्यालय, श्री वल्लभ संगितालय आणि पुणे भारत गायन समाज. या वाढीव गुणांकरीता प्रमाण देण्याची कार्यपद्धती १ मार्च २०१७ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याचे शिक्षण मंडळाने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

News Desk

अखेर मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

News Desk

“सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है”, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्ला

News Desk
महाराष्ट्र

महिलेवर सामूहिक बलात्कार , दोघाना अटक

News Desk

गौतम वाघ

उल्हासनगर : पैसे देण्याच्या बहाण्यानं महिलेला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना कल्याण तालुक्यातल्या द्वारली गावात घडलीये. धक्कदायक बाब म्हणजे बलात्कार करणारे दोन्ही आरोपी मुंबईच्या बेस्ट बसचे चालक असून उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

सुनील मोरे आणि अरविंद कुंभार अशी असून हे दोघंही पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत. यापैकी सुनील मोरे याच्याकडे पीडित महिलेच्या पतीनं १० हजार रुपये उसने मागितले होते. हे पैसे घेण्यासाठी मोरे यानं मित्राच्या बायकोला बुधवारी त्याच्या द्वारली पाड्यातील घरी बोलावलं आणि तिथे तिच्यावर मोरेसह अरविंद कुंभारनेही बलात्कार केला. या सगळ्या प्रकाराचं त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही केलं. यानंतर पीडितेनं शुक्रवारी अरविंद कुंभार याचा हा मोबाईल मिळवला आणि थेट पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी या दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

Related posts

शेतकरी आत्महत्ये प्रकरणी करमाळा बंद, मुख्यमंत्री आल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही

News Desk

भाजप-शिवसेना युतीचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित !

News Desk

मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती त्यामुळे त्यांनीच लक्ष द्यावं

News Desk