HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड शहरात आता दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी “नो-व्हेईकल डे” 

प्रदुषण नियंत्रणासाठी गुरुवारी वाहन न वापरण्याचे महापालिकेने केले आवाहन

उत्तम बाबळे

नांदेड :- शहरातील प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आता दर महिन्याचा पहिला गुरुवार हा “वाहन विरहीत दिन (नो-व्हेईकल डे)” म्हणुन पाळण्याचे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. याआवाहनात म्हटले आहे की, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत वाढते शहरीकरण, लोकसंख्या व सतत वाढणारी वाहन संख्या यामुळे प्रदुषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढणाऱ्या वाहन संख्येमुळे शहरामध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून शहरामध्ये प्रत्येक महिन्याचा पहिला गुरुवार हा “वाहन विरहीत दिन (नो-व्हेईकल डे )” म्हणून पाळण्याचा संकल्प नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. अशारीतीने “वाहन विरहीत दिन (नो-व्हेईकल डे)” चे पालन केल्याने शहरामध्ये ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण कमी करणे, वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी करणे, इंधनाची बचत करणे, तसेच नागरिकांमध्ये सायकल वापरण्याची सवय वृद्धींगत करणे या गोष्टी साध्य होतील. त्यामुळे महापालिकेतर्फे शहरातील सर्व नागरिकांना तसेच विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदींना दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दुचाकी, चारचाकी वाहन न वापरता सार्वजनिक वाहनांचा किंवा सायकलचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांसोबत कोणत्या विषयांवर चर्चा झाली?, खुद्द पवारांनीच दिलं उत्तर

News Desk

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन

News Desk

किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Aprna