HW News Marathi
महाराष्ट्र

भोकर : कॉग्रेसच्या बालेकिल्यात भाजपाने लावले सुरुंग

जि.प.निवडणुकीत काँग्रेसचे भोसीकर व रावणगावकर तर भाजपाचे सुंरकूंटवाड विजयी

पं.स. सभापती पदाच्या दावेदार काँग्रेसच्या झिमाबाई चव्हाण विजयी

उत्तम बाबळे

भोकर : – तालुक्यातील जि.प. व पं.स.च्या संपन्न झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ३गटांपैकी २ मध्ये अनुक्रमे भोसीकर , रावणगावकर यांनी तर १ गटात भाजपाच्या सुरकूंटवाड यांनी विजयश्री प्राप्त केली असून पं.स.च्या ६ गणांपैकी केवळ ३ गणांमध्ये काँग्रेसला विजय प्राप्त करता आला आहे. पं.स.सभापती पदाच्या दावेदार झिमाबाई चव्हाण या निवडूण आल्या असल्या तरी बहुमत सिद्धतेसाठी अपक्ष निवडूणआलेल्या बिल्लेवाड यांची काँग्रेसला मनधरणी करुन त्यांना उपसभापती पद द्यावे लागणार आहे.तर पाळज गट हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणुन परिचीत होता.या बालेकिल्ल्याला भाजपाने मोठे सुरुंग लावले असून जि.प.गट व पं.स.गणात भाजपाने काँग्रेसला हद्दपार केले आहे. भोकर तालुक्यातील ३ गट व ६ गणांसाठी एकूण ७६,२२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.७०.१५ टक्के मतदान झाले असून यात ७०.७१ टक्के पुरुष व ६९.५६ टक्के महिलां मतदारांचा समावेश आहे.या मतांची २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजता पासून तहसिल कार्यालयाच्या तिस-या मजल्यावरील सभागृहात प्रथम गट व नंतर त्याच गटातील २ गण निहाय मतांची १२ टेबलवर मोजणी करण्यात आली.२५-पाळज गटाची प्रथम मोजणी केली असता भाजपाचे उमेदवार सुरकूंटवाड दिवाकर नारायणरेड्डी यांना ७,०१४,तर काँग्रेसचे गोपीडवाड नरसारेड्डी राजारेड्डी यांना ६,३५१ मते मिळाली.यात सुरकूंटवाड दिवाकर रेड्डी यांनी ६६३ मतांनी काँग्रेसच्या गोपीडवाड यांचा पराभव केला.दुस-या फेरीच्या मोजणीत २६-भोसी जि.प.गटातील काँग्रेसचे उमेदवार कल्ल्याणकर प्रकाशराव भगवानराव देशमुख भोसीकर यांना ७,९९२ तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार वाकदकर श्रीराम रावसाहेब यांना ५,२४९ मते मिळाली.यात कल्याणकर प्रकाशराव देशमुख यांनी २,७४३ मते घेऊन विजयश्री प्राप्त केली.तसेच तिस-या फेरीत २७- पिंपळढव जि.प.गटाच्या मतमोजणीत कदम बाळासाहेब किशनराव पा.रावणगावकर यांना ५,९७४ तर अपक्ष उमेदवार घिसेवाड नागनाथ लक्ष्मणराव यांना ५,६५२ मते मिळाली.यात कदम बाळासाहेब पा.रावणगावकर यांचा ३२२ मतांनी विजय झाला.तसेच पंचायत समिती ६ गणांतील विजयी व पराभुत तुल्यबळ उमेदवार पुढील प्रमाणे असून त्यांचा पक्ष आणि मिळालेली मते कंसात दर्शविली आहेत.४९-देवठाणा गण-कदम सुभाष विठ्ठलराव (भाजपा,३,७८५,९५३ मतांनी विजयी),जाधव जैवंत सिताराम(काँग्रेस,२,८३५,पराभुत),५०-पाळज गण-जाधव सागरबाई गणपत(भाजपा,३,७६०,९८८ विजयी),डोंगरे सागरबाई लक्ष्मण (काँग्रेस,२,७७२,पराभुत),५१-भोसी गण-कोठूळे नागोराव गुणाजी(काँग्रेस,३,१५२,२९८ विजयी),राठोड जमुनाबाई बाबूराव (ब.वि.आ.२,८५४,पराभुत),५२-रिठ्ठा गण-चव्हाण झिमाबाई गुलाब(काँग्रेस,२,९७९,६९५विजयी),अमृतवाड अनिता माधवराव (अपक्ष,२,२८४,पराभुत),५३-हाळदा गण-बिल्लेवाड सुर्यकांत गंगाधर(अपक्ष,२,५५६,२६४ विजयी),राठोड अरुणाबाई बालाजी(काँग्रेस,२,२९२,पराभुत),५४-पिंपळढव गण-रावलोड निता व्यंकटेश(काँग्रेस,२,९८४,६९८ विजयी),दोन्तुलवाड सुनिता मलेश्वर(अपक्ष,२,२८६ ,पराभुत). भोकर पंचायत समिती सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असल्याने या पदाच्या दावेदार काँग्रेसच्या चव्हाण झिमाबाई याच आहेत.सलग दुस-यांदा सभापती पद हे बंजारा समाजाला मिळाले असल्याने तालुक्यातील समाज आनंदी झाला आहे.परंतु काँग्रेसकडे बहुमत नसल्यांने अपक्ष बिल्लेवाड सुर्यकांत यांची मनधरणी काँग्रेसने सुरु केली असून उपसभापती पद ही देण्याची चर्चा सुरु झाली आहे.यात विशेष म्हणजे पाळज गट हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणुन परिचीत आहे.याच मतदार संघाने काँगेसला डाॅ.सुरेश किनीकर व मंगाराणी अंबुलगेकर यांच्या रुपाने २ समाज कल्ल्याण सभापती जि.प. दिले.परंतु यांनी या मतदार संघात कसलेही प्रभावी काम न केल्याने मतदारांनी मोठा सुरुंग लावत भाजपाला विजयश्री देत काँग्रेसला येथून हद्दपार केले आहे.केवळ भोसी व पिंपळढव चा गड खा.अशोकराव चव्हाण यांनी राखला आहे.निवडणूक निरीक्षक जगदिश मणीयार,नि.नि.अ.दीपाली मोतीयेळे,सहा.नि.नि.व्यंकटेश मुंडे,जी.डी.गोरे ,पो.नि.संदिपान शेळके यांसह पोलिस व प्रशासनाने निवडणूक मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया उत्तम प्रकारे सुरळीत पार पाडली असून दरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडला नाही

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार | मुख्यमंत्री

News Desk

मातोश्री २ च्या डील बाबतही चौकशी व्हायला हवी – संजय निरुपम

News Desk

सगळे एकत्र येऊन राज्याला स्थिर सरकार देऊ !

News Desk