HW News Marathi
महाराष्ट्र

सिंधुदुर्गात ‘येड्यांची जत्रा’!

मुंबई | केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्गात मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्गातील राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकरू आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. देवगडच्या दोन नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे राणेंना हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर पलटवार करत येड्यांची जत्रा अशी उपमा दिली आहे.

भाजप मधून शिवसेनेत प्रवेश

देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तसंच कणकवलीच्या माईन आणि कालमठ ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच धनश्री मेस्त्री आणि प्रज्ञा मिस्त्री यांचाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा करण्यात येत आहे. भविष्यात कणकवली मतदारसंघातील नितेश राणे यांचे निष्ठावंत म्हणवणारे अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतील आणि कणकवली शिवसेनामय होईल, असा दावाही करण्यात येत आहे.

काय आहे ट्विट?

नितेश राणे यांनी ट्विट करत त्यांचं मत सांगितलं आहे. ते म्हणाले, ” ‘आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच. यालाच म्हणतात “येड्यांची जत्रा” !!’ असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, दुसरीकडे रुग्णसंख्या घटल्यामुळे कोविड सेंटर बंद करण्यात येत आहेत. त्यावरुन माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. ‘एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगत आहेत की कोरोनाचं संकट अजून गेलेलं नाही, तिसरी लाट येऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला गणपती सणाच्या तोंडावर कोविड सेंटर बंद करण्याचा पराक्रम ठाकरे सरकार करतंय’, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय पथकाने अतिवृष्टीची आत्ता पाहणी करणं म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं!

News Desk

पुण्यात कोरोना बाधितांची संख्या २०४ वर, तर  मृतांचा आकडा २० वर पोहोचला 

News Desk

राज्यातील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत !

News Desk