HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप मंत्र्यांच्या वागणूकीचे कार्यकर्त्यानेच सोशल मिडियावर  काढले वाभाडे

 

आनंद कुलकर्णी, शहरमंत्री, विश्व हिंदू परिषद, जयसिंगपूर

चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

अजय कल्याणे

कोल्हापूर – भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूरातील माजी पदाधिकारी आणि विश्व हिंदू परिषदेचे जयसिंगपूर शहरमंत्री आनंद कुलकर्णी यांनी राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वर्तवणूकीबाबत सोशल मिडियातून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. मात्र, कुलकर्णी यांच्या या नाराजीची अद्याप पक्षश्रेष्ठींकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही.

कुठल्यातरी कामानिमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेलो असता तीन-चार तास केवळ बसवून ठेवलं, मात्र काम काही झालंच नाही, अशा शब्दात कुलकर्णी यांनी आपली व्यथा महाबातमीकडे व्यक्त केली. कुलकर्णी यांचं म्हणणं त्यांच्याच शब्दात खाली देत आहोत. कुलकर्णी यांच्या फेसबुक पेजवरून साभार.

परवाची गोष्ट… जयसिंगपूरच्या गांधी चौकात मी आणि संजय वैद्य (जयसिंगपूरचे) बोलत उभे होतो. रेल्वे स्टेशनकडून गाड्यांचा ताफा आला. एका गाडीत मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. त्यांच्या सोबत जयसिंगपूरातील भाजपाचे कार्यकर्ते…. त्यांनी हात केला पण दादा दखलही न घेता निघून गेले. आम्हाला पदवीधर मतदार संघाची निवडणूक आठवली.

दादा उमेदवार…. प्रचारासाठी जयसिंगपूरला येणार होते. सकाळी ८ ची वेळ ठरली. दादांचा सात वाजता संजय वैद्यना फोन…. शिरोलीतून पुढे आलोय. दादा पावणे आठला संजय वैद्य यांच्या घरी हजर… दिवसभर भेटीगाठी… दुपारी प्रेस…. आम्हाला चार्ज करुन दादा निघून गेले. आम्ही दादांच्या विजयासाठी राबलो. दादांना निसटता का असेना विजय मिळाला. खूप बरं वाटल तेव्हा….

आज…..

दादा मंत्री झाले…. दादा तेच, आम्ही कार्यकर्ते तेच… पण लाल दिव्यान जादू केली…. दादांच्या नजरेला आता आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते पडत नाहीत… कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील सत्ते शिवाय जगू शकत नसलेले मासे दादांच्या गळाला लागताय… दादा त्याच गोतावळ्यात सुजलेल्या भाजपाला वाढलेला भाजप समजून मुळालाच विसरतायत…. पण, सूज उतरली की झाडाला मुळाचाच आधार असतो…. किंबहूना सूजेचा भारही मुळच सोसतात….

वाईट कशाच वाटल ….

ज्या काळात भाजपच नाव घेतल तर गावात कुणी पाणीही विचारत नव्हत त्या काळात मी भाजपचा जयसिंगपूर शहर अध्यक्ष होतो. सुभाष वोरा यांनी इचलकरंजी मतदार संघातून लोकसभा लढवली तेव्हा घरातल्या टेबल खुर्च्या जीपमधून नेवून शिरोळ तालुक्याच्या ५२ गावात मी सभा घेतल्या. नंतर कोल्हापूर जिल्हा चिटणीस होतो.

चार उंबऱ्यात बंदिस्त झालेली जयसिंगपुरातील भारतीय जनता पार्टी खुली करुन बहुजन समाजाचे प्रतिनिधी पक्षात आणण्याचे काम संजय वैद्य यांनी केले. ते शहराध्यक्ष आणि मी जिल्हा चिटणीस असताना जयसिंगपुरात भाजपाचे कार्यालय सुरु झाले. कमळाच्या चिन्हावर मुस्लिम समाजातील कार्यकर्ता नगरसेवक म्हणून नगरपालिकेत पाठवण्याचा चमत्कारही संजय वैद्य यांनीच घडवला होता….

.

आज आम्ही कुठे आहोत ? गेली अनेक वर्षे आमच्यासारखे कार्यकर्ते जमीन नांगरत आले. दादांना मिळालेल्या लाल दिव्याच्या भाग्यात या कार्यकर्त्यांच्या मशागतीचे काहीच योगदान नाही का ? की सत्तेची धुंदी विस्मरण वाढवते…..

देशात आणि राज्यात आज भाजपची सत्ता आहे. आज पक्षाचा झेंडा घ्यायला कुणीही येईल. पण, दुर्दैवाने उद्या सत्ता गेलीच तर झेंडा घ्यायला कुणाचे खांदे मिळतील… आमच्यासारख्या विचारांना निष्ठा वाहिलेल्यांचेच ना ?

माझ्या मनात उगीचच हा विचार डोकावला. पण आता अस्वस्थ झालो नाही. मीच माझ्या मनाशी विचार केला….निष्ठावानांच्या नशीबी नेहमी सतरंज्या घालणेच असते बाबा…. !!!

आनंद कुलकर्णी

जयसिंगपूर

मो. ७७४४९६४५५०

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळी दिवशी शासनाच्या नावाने शिमगा

News Desk

महाविकासआघाडीवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या आमदारांची सोनिया गांधींकडे तक्रार

Aprna

Belgaum Bypoll Result : बेळगाव पोटनिवडणूकीत भाजप जागा राखणार, की शुभम शेळके बाजी मारणार?

News Desk