HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रपती निवडणूक मतदानावेळी सत्ताधारी-विरोधकांची एकमेकांवर नजर

मते फुटण्याची प्रत्येक पक्षाला भीती

मुंबई: प्रतिनिधी

राष्ट्रपती पदासाठी आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र राज्यातील बदलत्या राजकिय समिकरणानुसार सत्ताधारी आणि विरोधकांमधील मतदान फुटले जाण्याची शक्यता राजकिय वर्तुळात व्यक्त केली जात होती. त्यामुळे या दोघांकडूनही विधिमंडळात मतदानासाठी येणारÞ्या प्रत्येक आमदारांवर आणि त्याच्या संपर्कावर लक्ष ठेवण्यात येत होते.

रालोआकडून राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद आणि कॉंग्रेसप्रणित आघाडीकडून लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र विरोधी पक्षातील विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे काही आमदार सत्ताधारी भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. तर भाजपवरील राजकिय राग व्यक्त करण्यासाठी शिवसेनेकडून कोविंद यांना पाठिंबा जाहीर करूनही मीरा कुमार यांना मतदान करण्यात येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्यामुळे समर्थन देणार-या पक्षांसह स्वपक्षाच्या आमदारांवर भाजप आणि कॉंग्रेसकडून चांगलेच लक्ष ठेवले जात होते. त्याचबरोबर प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य लक्षात घेवून राष्ट्रपती पदाचे उमेदवार कोविंद आणि मीरा कुमार यांना ठरलेली मते मिळतील याकडे या दोन्ही पक्षांकडून लक्ष ठेवले जात होते अशी माहिती विधिमंडळातील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

महाराष्ट्र विधिमंडळातील एकूण सदस्य २८८ असून यातील भाजपचे १२२, शिवसेनेच्या ६३, कॉंग्रेसच्या ४२, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ४१, शेतकरी कामगार पक्ष ३, एमआयएम २, भारिप ब.म. १, माकप १, मनसे १, रासप १, सपा १, अपक्ष ७ आणि बहुजन विकास आघाडीच्या ३ पैकी २ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर हे विदेशात असल्याने ते गैरहजर राहील्याचे त्यांनी सांगितले.

भुजबळ, कदम यांनी मतदानाचा हक्क बजाविला

राष्ट्रपती निवडणूकीसाठी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आॅर्थर रोड तुरुंगातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदम यांना विधिमंडळात आणण्यात आले. यापैकी रमेश कदम यांना पोलिस व्हॅनमधून तर भुजबळ यांना रूग्णवाहीकेतून सकाळीच आणण्यात आले. छगन भुजबळ यांनी विधिमंडळात मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर परतताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी त्यांना वाकून नमस्कार केला. तसेच संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भुजबळांनी फारसे बोलण्याचे टाळत विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची भेट घेतली. त्यानंतर ते आलेल्या रूग्णवाहीकेकडे रवाना झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक रुग्ण!

News Desk

“कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा करतो”, राऊतांचा मोदींना टोला

News Desk

रायगड किल्ला व परिसर विकासाच्या कामासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार – अजित पवार

News Desk